Cycling Record: अमरावतीच्या सृजलने ओलांडल्या सात राज्यांच्या सीमा ;११ दिवस २३ तासांत ३७५० किलोमीटरची केली सायकलिंग

Srujal KohaleCycling Record: अमरावतीच्या १७ वर्षीय सृजल कोहळे याने अरुणाचल प्रदेशातील किबिथू ते गुजरातमधील कोटेश्वर असा ३,७५० किलोमीटरचा सायकलप्रवास ११ दिवस २३ तास १० मिनिटांत पूर्ण केला. सात राज्यांतून प्रवास करत त्याने देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे नवा विक्रम नोंदवला.
17-year-old Srujal Kohale completes a 3,750-kilometre cycling journey from Kibithu to Koteshwar

17-year-old Srujal Kohale completes a 3,750-kilometre cycling journey from Kibithu to Koteshwar

esakal

Updated on: 

अमरावती : खडतर रस्ते, वादळवाऱ्यासह पावसाच्या सरी, घाटवळणाचे रस्ते अन् तब्बल सात राज्यांतून सायकलने प्रवास करीत अमरावतीच्या सृजल प्रवीण कोहळे या १७ वर्षीय मुलाने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे सायकलप्रवास करून त्याने अमरावतीच नव्हे तर देशाच्या सायकलिंगच्या इतिहासात नवा अध्याय जोडला आहे.

Loading content, please wait...