

Exam
sakal
खापरखेडा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा लवकरच सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर खापरखेडा परिसरातील सर्व परीक्षा केंद्रांवर व्यापक आणि काटेकोररित्या तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तर, विद्यार्थ्यांना भयमुक्त, तणावमुक्त आणि पारदर्शक वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी शाळा प्रशासन व शिक्षण संस्थांनी विशेष नियोजन केले आहे.