
दहेगाव (गोसावी) यालाच तुळजापूर रेल्वे या नावाने सुध्दा ओळखले जाते या गावात फार पुर्वीपासुन रेल्वे स्टेशन आहे आणि आता काही वर्षा अगोदर सिंदी पोलिस ठाण्यातुन वेगळे करित येथे स्वतंत्र पोलिस ठाणे अस्तित्वात आले आहे.
सिंदी रेल्वे (जि. वर्धा) : विदर्भ राज्य आघाडीचे तालुका प्रमुख रामकिशोर शिंगणधुपे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आणि १५ वर्षाने दहेगावा (गोसावी) येथे मंगळवारी (ता.१९)सकाळी ७:३० वाजता वर्धा डेपोच्या लालपरीचे आगमन झाले असता ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.
नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार
दहेगाव (गोसावी) यालाच तुळजापूर रेल्वे या नावाने सुध्दा ओळखले जाते या गावात फार पुर्वीपासुन रेल्वे स्टेशन आहे आणि आता काही वर्षा अगोदर सिंदी पोलिस ठाण्यातुन वेगळे करित येथे स्वतंत्र पोलिस ठाणे अस्तित्वात आले आहे. मात्र आतील गाव असल्याने दळणवळणासाठी येथील ग्रामस्थांना फार त्रास आणि आर्थिक दृष्ट्या अडचणीचे होते.
विशेष म्हणजे दररोज सकाळी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामासाठी गावाबाहेर शहरात जाणार्याना फारच अडचणीचे होत शिवाय मागील वर्षभरापासून रेल्वे बंद असल्याने हा त्रास कमालीचा वाढला होतो.म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे तालुका प्रमुख रामकिशोर शिंगणधुपे यांनी ही समस्या हेरली आणि सतत पाठपुरावा केला. यासाठी असंख्य वेळा त्यांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयाचे उंबरठा झिझविला.
त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत मंगळवारी ता. १९ पंधरा वर्षांपासून बंद पडलेली बससेवा लालपरीच्या आगमनाने पुर्वत सुरु झाली. हा दिवस उजडण्यासाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे यांचे खुप आभार मानले. लालपरी आगमनाप्रसंगी बस गाडीचे पुजन करुन चालक आणि वाहकाचा नारळ आणि दुप्पटा देऊन सन्मान करण्यात आला. सोबतच मिठाई वाटुन सर्वानी आनंद साजरा केला.
संपादन - अथर्व महांकाळ