esakal | प्रेमासमोर जन्मदात्याचा विसर! 'प्लीज पप्पा, तक्रार नका देऊ न' असं म्हणत चाकूहल्ला करणाऱ्या मुलाची घेतली बाजू
sakal

बोलून बातमी शोधा

Girlfriend took side of boyfriend after he attack on her father

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीडित युवती दोन बहिण व वडिलांसह राहते. ती बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिचे गौरव ठाकूरसोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध आहेत.

प्रेमासमोर जन्मदात्याचा विसर! 'प्लीज पप्पा, तक्रार नका देऊ न' असं म्हणत चाकूहल्ला करणाऱ्या मुलाची घेतली बाजू

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या वडिलांकडे लग्नाची मागणी घातली. लग्नास नकार दिल्यामुळे वडिलांवर प्रियकराने चाकूने हल्ला केला. ही थरारक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गौरव ठाकूर (पारडी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीडित युवती दोन बहिण व वडिलांसह राहते. ती बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिचे गौरव ठाकूरसोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध आहेत. दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या. तसेच मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कातही होते. त्यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकूण युवतीच्या घरापर्यंत पोहचली. त्यामुळे तिच्या बहिणी आणि वडीलाने तिचे घराबाहेर निघणे बंद केले. तसेच तिच्याकडून फोनही हिसकावून घेतला. त्यामुळे तिचा प्रियकर गौरव चिडला. 

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

त्याने प्रेयसीच्या मैत्रिणीकडून तिची माहिती घेतली. तिला घरी होत असलेला त्रास त्याला असह्य झाला. त्यामुळे तो बुधवारी रात्री आठ वाजता प्रेयसीच्या घरी गेला. त्याने तिच्या वडिलांची भेट घेतली. ‘तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे..तिच्याशी मला लग्न करायचे आहे.’ अशी बोलत लग्नाची मागणी घातली. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी चिडून त्याला ‘तू घराबाहेर निघ...’ असे बजावले. मात्र तो घराबाहेर निघायला तयार नव्हता. धक्के देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने पाठीमागे लपविलेला चाकू काढला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. 

लग्नास नकार देताच चाकूने हल्ला केला. मांडीवर आणि हाताला चाकुचे वार लागल्याने वडिल जखमी झाले. गौरवला बळजबरीने बाहेर काढल्यानंतर त्याने दरवाज्याला लाथा मारल्या आणि तो दगडाने फोडण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी धाव घेतल्यानंतर गौरव पळून गेला. या प्रकरणी प्रेयसीच्या बहिणीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

नक्की वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

प्लीज पप्पा.. तक्रार नका देऊ न...

माझे त्याच्यावर प्रेम आहे. तो खूप चांगला मुलगा आहे. माझ्यावर खूप प्रेम करतो. पप्पा प्लीज..पोलिसात तक्रार नका देऊ नं. त्याला माफ करा नं...अशी विनवणी ती वडीलांना करीत होती. तसेच पोलिसांनाही गौरवला मारू नका..अटक करू नका अशी विनंती करीत होती. या प्रकारामुळे ठाण्यातही बरीच तारांबळ उडाली आणि पोलिसही पेचात पडले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top