Gondia Bus Accident : अपघातग्रस्त ‘शिवशाही’चा चालक निलंबित...न्यायालयाने सुनावली २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
Gondia Shivshahi bus driver Suspended : गोंदियात झालेल्या एसटी बस अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आणि २९ जण जखमी झाले. चालक प्रणय रायपूरकर याला निलंबित करून २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा-खजरीलगतच्या वृंदावनटोला फाट्याजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातासाठी जबाबदार ठरवून एसटी महामंडळाने चालक प्रणय रायपूरकर याला निलंबित केले. दरम्यान, न्यायालयाने त्याची २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.