

Vidarbha
esakal
गोंदिया, ता. १० ः 'एक देश, एक कार्ड' या संकल्पनेअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनेला प्रतिसाद मिळत असला, तरी दिव्यांगांसाठी स्मार्ट कार्ड बनविण्याची प्रक्रिया बंद असल्याने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या १ ऑगस्टपासून सवलतीच्या प्रवासासाठी हे कार्ड अनिवार्य होणार असल्याची माहिती आहे.