चंद्रपूर - एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

चंद्रपूर - एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
Updated on
Summary

आत्महत्या केलेला कर्मचारी सत्यजित ठाकूर हा ३४ वर्षांचा होता आणि चारच महिन्यांची मुलगी आहे.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून आता आणखी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घजली आहे. चंद्रपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. शहारतील प्रमुख आगारामध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून काम करणाऱ्या सत्यजित ठाकूर यांनी विष प्राशन करून जीवन संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला असतानाच आत्महत्येच्या या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे. याआधी अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. य़ाआधीच्या संपावेळीसुद्धा एका कर्मचाऱ्याने एसटीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

चंद्रपूर - एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
ST संप - राज्यसरकार समिती स्थापन करणार; मंत्री परबांची माहिती

आत्महत्या केलेला कर्मचारी सत्यजित ठाकूर हा ३४ वर्षांचा होता आणि चारच महिन्यांची मुलगी आहे. त्यांची पत्नी नागपूरला राहते. दोनच दिवसांपूर्वी ते ब्रह्मपुरीला आले होते. त्यांचा फोन स्वीच ऑफ लागल्यानंतर पत्नीला शंका आली. त्यानंतर पत्नीने त्यांच्या सहकाऱ्यांना कॉल केले. तेव्हा सहकाऱ्यांनी घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Japtalai Ashram School
Samruddhi Expressway Container Action
Melghat Ashram School Student Health Row
Chandrapur Midday Meal Scheme
Marathi News Esakal
www.esakal.com