ST संप - राज्यसरकार समिती स्थापन करणार; मंत्री परबांची माहिती

राज्यात अनेक ठिकाणी मध्यरात्री १२ पासून एसटी कामगारांचा संप सुरु झाला आहे.
Anil parab
Anil parabsakal media
Updated on: 
Summary

राज्यात अनेक ठिकाणी मध्यरात्री १२ पासून एसटी कामगारांचा संप सुरु झाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने लालपरीची चाके थांबली आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर विरोधकांकडून टीकास्त्र सुरु आहे. आजही राज्यात ठिकठिकाणी संप सुरुच आहे. दरम्यान, आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्वाची माहिती दिली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्याबाबतचा अभ्यास करण्यासाठी आज राज्य सरकार समिती स्थापन करणार आहे. आज दुपारी ३ च्या आधी न्यायालयाच्या आदेशानुसार या समितीचा जीआर जारी करणार आहे. तसेच ही समिती विलिनीकरणाबाबत अभ्यास करून सरकारला अहवाल देणार असल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मध्यरात्री १२ पासून एसटी कामगारांचा संप सुरु झाला आहे. पुणे विभागातील १३ डेपो अद्यापही बंदच आहेत. लालपरीची चाके थांबल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता मिळावा अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. आता याला राज्यसरकारकडून यावर कोणता निर्णय होणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे.

Anil parab
'आर्यनच्या सुटकेसाठी बैठका, पण ST कामगारांसाठी वेळ नाही'

हा शासन निर्णय आजच तीन वाजेपर्यंत काढा. याबाबत आज सायंकाळी 5 वाजता बैठक घेऊन तो सादर करून, 12 आठवड्याच्या आत विलगीकरण करण्यासाठी कालावधी दिला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची भूमिका बजवावी असेही न्यायालयाने या आदेशात सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com