"स्टाफ सिलेक्‍शन'मध्ये आता चार टप्पे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

नागपूर : केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील पदांच्या नियुक्‍तीसाठी स्टाफ सिलेक्‍शन कमिशनद्वारे (एसएससी) परीक्षा पद्घतीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी निवडीसाठी राबविण्यात येणाऱ्या तीन टप्प्याऐवजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे चार टप्प्यात निवड प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

नागपूर : केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील पदांच्या नियुक्‍तीसाठी स्टाफ सिलेक्‍शन कमिशनद्वारे (एसएससी) परीक्षा पद्घतीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी निवडीसाठी राबविण्यात येणाऱ्या तीन टप्प्याऐवजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे चार टप्प्यात निवड प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

देशात दरवर्षी स्टाफ सिलेक्‍शन कमिशनद्वारे (एसएससी) दोन लाखांहून अधिक पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे आयोजन केले जाते. यात कमिशनद्वारे पूर्व परीक्षा, मुख्य आणि मुलाखत या तीन प्रक्रिया राबविण्यात येतात. मात्र, यावर्षी परीक्षांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या प्रक्रियेत पूर्व परीक्षा, संगणकीय परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी - न्या. विकास सिरपूरकर करणार हैदराबाद एन्काउंटरची चौकशी

वाढता व्याप हे कारण
याशिवाय संयुक्त पदवीस्तरावर यापूर्वी देण्यात येणारा 75 मिनिटांचा कालावधीही कमी करण्यात आला असून आता तो 60 मिनिटांचा करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी केंद्रीय सहायक सेवा या पदासाठी अर्थ विभागाकडून परीक्षा घेण्यात येत होती. मात्र, या पदासाठी आता स्टाफ सिलेक्‍शन कमिशनद्वारे (एसएससी) परीक्षा घेणार आहे. यासाठी अर्थ विभागाचा कामाचा वाढता व्याप हे कारण देण्यात आले आहे.
दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होत असतात. लेखी परीक्षा यावर्षीपासून ऑनलाइन करण्यावरही स्टाफ सिलेक्‍शन कमिशनद्वारे (एसएससी) भर देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना निश्‍चितच फायदा
स्टाफ सिलेक्‍शन कमिशनकडे वाढता कल आणि त्यामधून वाढणारी स्पर्धा लक्षात घेता हा बदल करण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्‍चितच फायदा होईल.
डॉ. सुरेश जाधव, संचालक, पास ऍकेडमी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Staff Selection commision recruitment has four stages