हिंगणघाटात वाढलाय राज्य फुलपाखरांचा वावर; अभ्यासक, पक्षीप्रेमीसाठी नवी पर्वणी

file photo
file photo

नंदोरी (जि. वर्धा) : कोरोनाचे जागतिक महामारीमुळे राज्य 15 मार्च ते 31 मेपर्यंत लॉकडाउन होते. परिणामी प्रदूषणाची पातळी घटली; यामुळे हिंगणघाट शहरात पक्षी, फुलपाखरे मनमोकळेपणाने झाडाझुडपांवर, घराच्या परसबागेत पाहावयास मिळत आहेत. हिंगणघाट शहरात पद्मावती नगरातील रश्‍मी चंदनखेडे यांच्या परसबागेत राज्यफुलपाखरांचा वावर वाढला आहे.

प्रामुख्याने या फुलपाखरांत राज्य ब्लू मारमान, निलवंत राणी, पाकोळी यांचा समावेश आहे. राज्य वन्यजीव मंडळाने या फुलपाखराला राज्य फुलपाखरांचा दर्जा दिला आहे. हे फुलपाखरू (ब्ल्यू मारमान) राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात फुलपाखरांच्या जवळपास 225 प्रजाती आहेत.


देशातील 15 टक्‍के फुलपाखरे महाराष्ट्रात

देशातील 15 टक्‍के फुलपाखरे महाराष्ट्रात आढळतात. एरवी नाशिक, पुणे भागात आढळणारे राज्य फुलपाखरू, ब्लू मारमान वर्धा, हिंगणघाटमध्ये कधी कधी पाहावयास मिळतात; मात्र, हिंगणघाट शहरातील पद्‌मावतीनगरातील रश्‍मी चंदनखेडे यांच्या परसबागेत या फुलपाखरांचा वावर सध्या वाढला आहे.

फुलपाखरांचा अभ्यास

निसर्गसाथी फाउंडेशनच्या फुलपाखरू अभ्यासक रश्‍मी चंदनखेडे यांनी घरी आलेल्या निलवंत जातीचा राज्य फुलपाखराचे छायाचित्र घेतले आहे. निसर्गसाथीच्या वतीने प्रवीण कडू, रश्‍मी चंदनखेडे, राकेश झाडे फुलपाखरांचा अभ्यास करीत आहेत. त्यांच्या वाढलेल्या वर्दळीचे छायाचित्र घेण्याचे काम करीत आहेत.


ब्लू मारमान हे फुलपाखरू
राज्य फुलपाखरू ब्लू मारमान हे फुलपाखरू भारतातील आकाराने सर्वांत मोठ्या असलेल्या सदर्न बडलिंग या फुलपाखरानंतरचे सर्वांत मोठे असून ते मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. ब्लू मारमान हे राज्य फुलपाखरू श्रीलंका व भारतातील महाराष्ट्र, दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. सध्या विदर्भापासून पश्‍चिम महाराष्ट्रात त्याचा वावर आहे.
- रश्‍मी चंदनखेडे,
सदस्य निसर्ग साथी, हिंगणघाट.



(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com