Wardha News: राज्यात साडेपाच हजार शाळा आहेत अंधारातच; युडायस प्लसचा अहवाल
UDICE Report: राज्यातील शाळा वीज, इंटरनेट, संगणक सुविधा आणि स्वच्छतागृह यांच्या अभावामुळे शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे. सुधारणा आवश्यक आहे. शिक्षक तुटवडा आणि मूलभूत सुविधा नसणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करीत आहे.
नंदोरी : राज्यातील २५ हजार ९५८ शाळांमध्ये संगणक सुविधा, ३० हजार १६६ शाळांमध्ये इंटरनेट, ५ हजार ५६७ शाळांमध्ये वीज नसल्याची बाब केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युडायस प्लस २०२४-२५ अहवालात उघड झाली आहे.