दोन्ही परीक्षा एकाच दिवशी! आता काय करावे? विद्यार्थ्यांना पडला प्रश्‍न  

Exam
Exam

अमरावती ः राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच अमरावती विद्यापीठाचे पेपर्स एकाच दिवशी, म्हणजेच ११ ऑक्‍टोबरला असल्याने विद्यार्थ्यांमध्ये  चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनासाठी महत्त्वाच्या असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच गोची झाली आहे.

११ ऑक्‍टोबर रोजी राज्यसेवा परीक्षा असून याच दिवशी अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षासुद्धा आहेत. राज्यसेवा परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळेत होणार असून याच दिवशी विद्यापीठाचे एम.ए. द्वितीय वर्षाचे व चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचे इतिहास आणि राज्यशास्त्र याविषयांचे पेपरदेखील आहेत. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परीक्षा कशा द्याव्यात, असा प्रश्‍न आता विद्यार्थ्यांना पडला आहे. अनेक विद्यार्थी कुठल्या तरी एका परीक्षेला मुकणार आहेत. 

यातून योग्य तो मार्ग काढून विद्यापीठाने पेपर पुढील तारखेला घ्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख आशीष ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात कुलगुरूंना निवेदनसुद्धा देण्यात आले. निवेदन देतेवेळी शाखाप्रमुख शिवम जवंजाळ, अजिंकय शेंडे, श्‍याम भनक, धीरज निंभोरकर, ऋषिकेश वासनकर, आकाश वाकोडे, अक्षय वानखडे आदींसह अन्य पदाधिकारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

दोन्ही परीक्षा अतिशय महत्त्वाच्या असून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने सोयिस्कर तारखेला परीक्षा घेणे योग्य ठरेल. याबाबत आम्ही कुलगुरुंना निवेदन दिले आहे.
-आशीष ठाकरे, उपशहरप्रमुख शिवसेना.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com