माहिती अधिकारातून समोर आली प्राथमिक शिक्षण विभागाची धक्कादायक माहिती

The states primary education department is in charge
The states primary education department is in charge
Updated on

अमरावती : राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार ५७ टक्के प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत कसाबसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती शिक्षक समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत अणावकर यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीवरून उघड झाले आहे.

राज्य शिक्षण आयुक्त कार्यालयाचे जन माहिती अधिकारी तथा सहायकांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात प्राथमिक विभागात शिक्षणाधिकाऱ्यांची १४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९९ शिक्षणाधिकारी कार्यरत आहेत तर ४५ पदे रिक्त आहेत. उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी ही समान श्रेणीतील पदे असून, महाराष्ट्रात एकूण ६१५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त २२९ पदे भरलेली असून, ३८६ पदे रिक्त आहेत. याचाच अर्थ ६२.७६ टक्के पदे रिक्त आहेत.

शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची एकूण मंजूर पदे ७५९ असून, त्यापैकी फक्त ३२८ पदे भरलेली आहेत. उर्वरित ४३१ पदे रिक्त आहेत. म्हणजेच ५६.७८ टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, प्रभावी प्रशासनाच्या दृष्टीने रिक्त पदांची संख्या मोठी आहे. उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या रिक्त असलेल्या ३८६ राजपत्रित दर्जाच्या पदावर शिक्षण विस्तार अधिकारी प्रभारी अधिकारी म्हणून काम करीत आहेत.

शिक्षण विस्तार अधिकारी हे अध्ययन अध्यापन क्षेत्रातील पर्यवेक्षकीय पदे असून प्रशासन व कार्यासनाचे आवश्‍यक असणारे ज्ञान व अनुभव त्यांच्याकडे नसतो. शिवाय उपशिक्षणाधिकारी किंवा गटशिक्षणाधिकारी पदाचे भरीव प्रशिक्षणसुद्धा त्यांना दिले जात नाही.

परिणामतः महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासकीय कारभार दीर्घकाळ ५७ टक्के प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत कसाबसा चालविला जात असून महाराष्ट्रातील तालुका व जिल्हा शिक्षण विभागस्तरावर शाळा आणि शिक्षकांच्या समस्यांचा गुंता अधिक वाढत आहे.

राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षण यंत्रणेची तर दयनीय अवस्था झाली आहे. या रिक्त पदांमुळे काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी तीन केंद्रांचा कारभार कार्यरत केंद्रप्रमुखांना पाहावा लागत आहे. त्यामुळे केंद्रप्रमुखांची फार मोठी दमछाक होत आहे. महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय स्तरावर शाळा आणि शिक्षकांच्या गुणवत्तेवर दूरगामी परिणाम होत आहे.

ताण वाढला आहे
संघटनेच्या माध्यमाने शासनाने वारंवार रिक्त पदे भरण्याची विनंती करण्यात आली आहे. ही पदे रिक्त असल्याने मुख्याध्यापक तसेच शिक्षकांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे शासनाने ही पदे तातडीने भरावीत.
- राजेश सावरकर,
पदाधिकारी, शिक्षक समिती, अमरावती

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com