टाकाऊ वस्तूंपासून बनवणार पुतळे...वाचा कसे? 

 A statue of Mahatma Gandhi and Vinoba Bhave will be erected at Sevagram
A statue of Mahatma Gandhi and Vinoba Bhave will be erected at Sevagram
Updated on

वर्धा : सेवाग्राम येथील अण्णासागर तलाव येथे महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे भव्य पुतळे उभारण्यात येणार आहेत. हे पुतळे धातूंच्या टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात येणार आहेत. त्यांची उंची 35 ते 40 फूट राहणार आहे. हे पुतळे (स्क्रॅप स्कल्पचर) तयार करण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या तीन प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली 25 विद्यार्थी व पाच तंत्रसहायक दिवसरात्र काम करीत आहेत. 

सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत शहरात विविध कामे सुरू आहेत. यात बऱ्याच जुन्या इमारतींची तोडफोड करण्यात आली आहे. यातून मोठ्या प्रमाणात टाकाऊ वस्तू निघाल्या आहेत. या वस्तू फेकण्यात जाणाऱ्या असल्याने यापासून काहीतरी नवीन बनविण्याचा मानस मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टसने व्यक्‍त केला. यापूर्वी त्यांनी भव्य चरख्याची निर्मिती केली होती. आता याच भागातील अण्णासागर परिसरात या दोन महाविभूतींचे पुतळे उभारले जाणार आहेत. 

यासाठी धातूंच्या टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात येत आहे. या कामात मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे अधिष्ठाता विश्‍वनाथ साबळे, उपकला संचालक विनोद दांडगे, प्रा. शशिकांत काकडे, प्रा. विजय सपकाळ, प्रा. विजय बोंदरे, प्रा. यशवंत भावसार व विद्यार्थी कार्यरत आहेत. या दोन्ही प्रतिकृती तयार झाल्यानंतर अण्णासागर तलावाचे सौंदर्य चांगलेच खुलणार आहे. 

याव्यतिरिक्‍त सेवाग्राम येथील चरखागृहाला भेट देऊन प्रस्तावित चरखा संग्रहालयाच्या कामाची पाहणी प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी केले. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत चरख्याचे महत्त्व अधोरेखित करणारे आणि महात्मा गांधींनी स्वराज्य व स्वावलंबनासाठी वापरलेल्या चरख्याचे महत्त्व दृकश्राव्य माध्यमातून मांडण्यात येत आहे. आठ कलात्मक दालनांमध्ये स्थापित केलेल्या या सादरीकरणाचे जिल्हाधिकाऱ्यांसोबत आलेल्या पाहुण्यांनी अवलोकन केले. तसेच चरखागृहात सुरू असलेली सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. 

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसह कला संचालक राजीव मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभूर्णे, अडारकर असोसिएट्‌सचे प्रतिनिधी वसीम खान यांच्यासह काम करणारे जे. जे. स्कूल आर्टस मुंबईचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

शहरातील इतर कामांचीही पाहणी

 सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत शहरात अनेक कामे करण्यात आली आहेत. यातील महात्मा गांधी चौक, आंबेडकर चौक, बजाज चौक येथे साकारण्यात आलेली म्यूरल व भित्तिचित्रांची पाहणी करण्यात आली. शिवाय सुरक्षिततेबाबत चर्चा करून आवश्‍यकतेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com