Video : इथेपण मुंबई इंडियन्स टॉपवर! 

Still on top of Mumbai Indians
Still on top of Mumbai Indians

नागपूर : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि कोरोना हेच दोन विषय कोरोना आल्यापासून चर्चेले जात होते. आयपीएल होणार की नाही, असा प्रश्‍न तमान क्रिकेट प्रेमींना पडला होता. कारण, आपल्या देशात क्रिकेटला सर्वाधिक पसंदी दिली जाते. तसेच क्रिकेटपटूंना देवाचा दर्जा दिला जातो. मात्र, कोरोनामुळे क्रिकेटवर तसेच अल्पावधित लोकप्रिय झालेले "आयपीएल'वर अनिश्‍चितेचे सावट आहे. यंदा आयपीएल होणार की नाही, असा प्रश्‍न प्रत्येकांना पडला असतानाही मुंबई इंडियन्स टॉपवर असल्याचे पाहायला मिळत आहे. हो... हो... मुंबई इंडियन्स टॉपवर... ते कसे वाचा सविस्तर... 

कोरोनाने आपल्या देशात शिरकाव केल्यावर युवा वर्गाकडून सोशल मीडियावर जोक्‍स टाकायला सुरुवात झाली. तसेच सर्वाधिक पसंद केले जाणाऱ्या "टिकटॉक'वर खिल्ली उडवली जात आहे. टिकटॉकवर नानाविध व्हिडिओ तयार करून शेअर केले जात आहेत. या व्हिडिओंना नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. कोरोना विषाणू देशात आल्यापासून व्हिडिओंची संख्या आणखीनच वाढली आहे. आतातर आयपीएल आणि कोरोना विषाणूला धरून व्हिडिओ व्हायरल केल जात आहेत.

भारतात क्रिकेटला मोठी पसंती दिली जाते. त्यातही आयपीएलची बातच न्यारी... आयपीएलने अनेकांना श्रीमंत केले तसेच अनेक खेळाडूंचे करिअर घडले आहे. घरगुती सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आयपीएलमुळेच प्राप्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनात अनेक खेळाडू आपले करिअर घडवित आहेत. आयपीएलचा लाभ जेवढा आपल्या देशातील खेळाडूंना मिळाला नाही तितका लाभ विदेशातील खेळाडूंना मिळाला आहे, हे विशेष... 

मात्र, कोरोना विषाणुमुळे यंदाचे आयपीएल होणार की नाही, याबाबत शंकाच आहे. त्यामुळे चाहते पार निराश झाले आहेत. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला तीन हजार कोटींच्यावर नुकसान सहन कराव लागणार आहे. फेंचायजी आणि टीव्हीकडून होणारे नुकसान वेगळेच. त्यामुळेच बीसीसीआय सुरुवातीला कोणत्याही परिस्थितीत आयपीएल करण्यासाठी तयार होते. मात्र, यावर्षी तरी हे शक्‍य नसल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे. मात्र, टिकटॉकवर आयपीएल सुरू असल्याचे दिसून येते. 

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. त्यानंतर दिल्ली, राजस्थान, कोलकाता येथे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यालाच धरून नेटकऱ्यांनी टिकटॉकर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. "हम सब आयपीएल स्कोर की जगे कोरोना का स्कोर देख रहे है. टॉप पर मुंबई इंडियन्स है. दिल्ली कॅपिटल्‌स और राजस्थान रॉयल्स उसका पिछा कर रही है. सीएसके पिढे है फिर भी रेस मे बनी हुई है. केकेआर तो डाक हॉर्स है.', "सिद्या जिथे आयपीएलचा स्कोर बघायचो की नाय तिथे आता कोरोनाचा स्कोर बघायला लागलो आहे. होय... त्यात भी मुंबई इंडियन्स टॉपला आहे. जय मुंबई इंडियन्स' असे व्हिडिओ टिकटॉकवर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

ऑडनंबरवरून मुंबईच ठरणार विजेता!

मंबई इंडियन्सने ऑडनंबर प्रमाणे 2013, 2015, 2017 व 2019 मध्ये आयपीएलवर आपले नाव कोरले होते. त्यामुळे आयपीलएलच्या सुरुवातीला आलेल्या जाहिरातीत मुंबई इंडियन्स यंदाचे आयपीएल जिंकणार का, असा प्रश्‍न रोहित शर्माला विचारला गेला होता. कारण, 2020 हा इव्हननंबर आहे. तेव्हा रोहित शर्माने यंदाचे आयपीएल 13 वे असल्याने जिंकणार असल्याचे म्हटले होते. कारण, 13 नंबर हा ऑडनंबर आहे.

फेव्हरेट संघांच्या राज्यातच कोरोना सर्वाधिक!

आयपीएलमध्ये खेळणारे आठ संघ आहेत. प्रत्येक संघाचा आपला चाहता वर्ग आहे. कारण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू या संघांत विभागले गेले आहेत. मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्‌स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्‌स, कोलकाता नाईट रायडर्स हे संघ प्रेक्षकांच्या पसंदीचे आहेत. याच राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण (व्हिडिओच्या संभाषनावरून) आढळून आले आहेत! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com