तरुणाने रागाच्या भरात तोडले बापाचे लिंग!

young boy killed father
young boy killed father

नागपूर : नाव विजय पिल्लेवान... वय 28 वर्षे... वेड बॉडी बिल्डिंगचे... त्यामुळे स्वतःची जिम तयार केली... तसेच ट्रेनर म्हणून कामही करीत होता... परफेक्‍ट बॉडी बनवण्यासाठी त्याने काही पावडर आणि स्टेरॉइडसचे इंजेक्‍शन घेणे सुरू केले होते... मात्र, गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन असल्याने जिम बंद आहेत... तेव्हापासून त्याने पावडर खाणे आणि इंजेक्‍शन घेणे बंद केले होते... परीनं तो नैराश्‍यात गेला होता... गेल्या चार दिवसांपासून तो फार तणावात होता... शनिवारी त्याने वडिलांचा खून केला... त्या नंतर जे घडले त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही... हा खून एखाद्या थरार पटालाही लाजवेल असा करण्यात आला... त्यामुळे कोणी नैराश्‍यात असाही प्रकार करू शकतो, हा प्रश्‍न सर्वत्र चर्चेला जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पिल्लेवान (वय 56 वर्षे) हे प्रॉपर्टी डीलर होते. नंदलाल चौकातील विघ्नहर्ता कॉलनीत ते कुटुंबासह राहत होते. त्यांना विक्रांत नावाचा मुलगा आणि सोनू नावाची धाकटी मुलगी आहे. 28 वर्षीय विक्रांतला बॉडी बिल्डिंगचे वेड लागले होते. परफेक्‍ट बॉडीसाठी त्याने काही पावडर आणि स्टेरॉइडसचे इंजेक्‍शन घेणे सुरू केले होते.

मात्र, कोरोना विषाणूचा देशात शिरकाव झाल्याने जवळपास मागील दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे जिम बंदच आहे. लॉकडाउनमुळे जिम बंद असल्याने त्याने पावडर खाणे आणि इंजेक्‍शन घेणे बंद केले होते. परीनं तो नैराश्‍यात गेला होता. चार दिवसांपासून तो फार तणावात होता. शनिवारी सकाळी तो वेड्यासारखा करीत असल्यामुळे वडिलांनी मित्रांच्या मदतीने त्याला दवाखान्यात नेले होते. दीड तास उपचार घेतल्यानंतर त्याला घरी परत आणण्यात आले. 

रात्री 11 वाजताच्या सुमारास विक्रांत अचानक किंचाळायला लागला. अकस्मात हिंसक झालेल्या विक्रांतने भिंतीला लाथा बुक्‍क्‍या मारणे सुरू केले होते. वडिलांनी त्याला समजवण्याचा व आवरण्याचा प्रयत्न केला; परंतु विक्रांतने अचानक जन्मदात्या बापावरच हल्ला केला. यानंतर त्याने वडिलांवर चाकूने हल्ला केला व गळा कापला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर वडिलांचे लिंग चक्क दातांनी तोडून बाजूला फेकले. 

यानंतर विक्रांतच्या एका मित्राने हुडकेश्‍वर पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी दुचाकीने घटनास्थळी आले. मात्र, विक्रांतचे रूप पाहून त्यांनी लगेच पोलिस ठाण्याकडे धाव घेतली आणि अर्ध्या तासानंतर 10 पोलिस कर्मचारी घेऊन परत घटनास्थळावर आले. त्यानंतर पोलिसांनी काही युवकांच्या मदतीने विक्रांतला पकडले आणि दोरीने बांधून पोलिसांच्या गाडीत कोंबले.

रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या विजय पिल्लेवान यांना पोलिसांनी उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी विक्रांत पिल्लेवान याच्यावर हत्याकांडाचा गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले आहे. तसेच घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

बहीण, आई बघतच राहिल्या

शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास विक्रांत अचानक किंचाळायला लागला. अकस्मात हिंसक झालेल्या विक्रांतने भिंतीला लाथा बुक्‍क्‍या मारणे सुरू केले होते. वडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तो वडिलांना बॉक्‍सिंग किटला मारतात तसे पंच मारत होता. त्याचे रूप पाहून बहीण व आई यांची मदतीला जाण्याची हिंमतच झाली नाही. पाहता पाहता त्याने वडिलांचा खून केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर वडिलांचे लिंग चक्क दातांनी तोडून बाजूला फेकले. हा सर्व प्रकार त्याची बहीण आणि आई हतबुद्ध होऊन बघत होत्या.

शेजाऱ्यांना केली शिवीगाळ

रात्री विक्रांत अचानक किंचाळायला लागला आणि भिंतीला लाथा व बुक्‍क्‍या मारणे सुरू केले. दरम्यान, त्याने शेजाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यासाठी उकसवणे सुरू केले. यामुळे वडील त्याला समजवण्यासाठी गेले. परंतु, रागाच्या भारात विक्रांतने वडिलांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. आई व बहिणीने आरडाओरड करीत शेजाऱ्यांना मदतीसाठी याचना केली. मात्र, विक्रांतचे अक्राळ-विक्राळ रूप पाहून कुणीही मदत करण्यासाठी आले नाही. येवढ्यात त्याने वडिलांचा खून केला. 

कृत्य मनोविकृतीचे लक्षण
बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन किंवा इंजेक्शन घेणे हा एक नशेचाच प्रकार आहे. ती नशा अचानक बंद झाल्यास मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. चिडचिड, आक्रमकता किंवा बुद्धीवर नियंत्रण नसणे असा प्रकार घडू शकतो. या युवकाने केलेले कृत्य मनोविकृतीचे लक्षण आहे. 
- प्रा. राजा आकाश,
मानसोपचार तज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com