Ganpati Visarjan procession in Jalgaon Jamod halted due to stone pelting incident; Ganesh Mandals demand actionesakal
विदर्भ
Ganesh Visarjan: लाईट घालवली अन् मिरवणुकीवर दगडफेक! 15 गणेश मंडळ रस्त्यावर थांबून, कारवाई केल्याशिवाय विसर्जन न करण्याची भूमिका
Stone Pelting Halts Ganpati Visarjan, Injures Police Officers: जळगाव जामोद येथे घडलेल्या या घटनेने स्थानिक प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. गणेश मंडळांच्या ठाम भूमिकेमुळे विसर्जन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दगडफेकीच्या घटनेने शहरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेत 15 गणेश मंडळांनी दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शहराच्या मुख्य रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीतील मूर्ती थांबून आहेत.

