Unseasonal Rain : भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वादळी पाऊस, वीज पडल्याने महिलेचा मृत्यू
Maharashtra Weather : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे मका, धान व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लग्न समारंभ आणि बाजारपेठांमध्येही गोंधळ उडाला.
भंडारा, गोंदिया : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात रविवारी (ता. २७) रोजी सायंकाळी वादळवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.