esakal | Video : कोरोनाच्या वादळात अस्मानी वादळाचीही भर, कोसळली झाडे, उडाली छपरे
sakal

बोलून बातमी शोधा

vadal

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा,कोरपना तालूक्यातील ब-याच भागाला आज चार वाजताच्या सुमारास वादळी पावसाने झोडपून काढले. साधारण अर्धा तास धो धो पाऊस बरसला. सखल भागात पाणी साचले. तर वादळात अनेक झाडे उन्मळून पडलीत.

Video : कोरोनाच्या वादळात अस्मानी वादळाचीही भर, कोसळली झाडे, उडाली छपरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : राजूरा,कोरपना तालूक्यातील ब-याच भागाला आज वादळी पावसाने झोडपून काढले. वादळी  वा-यात अनेक झाडे उन्मळून पडली. घरावरील टिनपत्रे उडाले. तर विद्यूत तारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने अनेक भागातील विद्यूत पुरवठा खंडित झाला. मार्गावर झाडे कोसळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा,कोरपना तालूक्यातील ब-याच भागाला आज चार वाजताच्या सुमारास वादळी पावसाने झोडपून काढले. साधारण अर्धा तास धो धो पाऊस बरसला. सखल भागात पाणी साचले. तर वादळात अनेक झाडे उन्मळून पडलीत.

सविस्तर वाचा - दुकान उघडताच नागरिकांनी लावल्या रांगा, चाळीस दिवसांनंतर मिळाली संधी

विद्यूत तारांवरती झाडे कोसळल्याने विद्यूत पुरवठा खंडित झाला आहे. अनेक मार्गावर झाडे आडवी पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वादळाने घरावरील टिनपत्रे उडाली आहेत. रस्त्यावर गारांचा खच पडला होता. दरम्यान वादळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहीती आहे.