esakal | पेट्रोलपंप मालकाने केला कडक नियम, ‘नो मास्क नो पेट्रोल’! 
sakal

बोलून बातमी शोधा

No mask

प्रशासनाकडून अनावश्‍यक गर्दी टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पण बाजारात गेल्यानंतर नागरिकांची एकाच ठिकाणी चांगलीच झुंबड झाल्याचे चित्र सहज दिसते. सध्या जिल्ह्यात दररोज शंभरावर मिळणारे रुग्ण याचीच देण असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे.

पेट्रोलपंप मालकाने केला कडक नियम, ‘नो मास्क नो पेट्रोल’! 

sakal_logo
By
रुपेश खैरी

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर महत्त्वाचे करण्यात आले आहे. असे असताना नागरिकांकडून या सर्वच प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बगल दिली जात आहे. अशात नागरिकांना मास्कची सवय लागावी म्हणून येथील कारला मार्गावर असलेल्या पेट्रोलपंप मालकाने थेट ‘नो मास्क नो पेट्रोल’चा फलक समोरच लावला आहे. 

प्रशासनाकडून अनावश्‍यक गर्दी टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पण बाजारात गेल्यानंतर नागरिकांची एकाच ठिकाणी चांगलीच झुंबड झाल्याचे चित्र सहज दिसते. सध्या जिल्ह्यात दररोज शंभरावर मिळणारे रुग्ण याचीच देण असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे. हा प्रकार रोखण्यात सध्या प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तरी यावर सहज आळा बसविणे शक्‍य आहे. 

यातूनच वर्ध्यातील कारला मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंप मालकाने थेट पंपावर ‘नो मास्क नो पेट्रोल’ असा फलक लावला आहे. शिवाय मास्क नसलेल्यांना येथून परत केल्याची माहितीही येथे कार्यरत कर्मचाऱ्याने दिली. असा नियम जर प्रत्येक दुकान मालक, व्यापाऱ्याने केला तर जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊनचीही गरज पडणार नाही आणि पसरत असलेला संसर्ग रोखणे शक्‍य होईल, असे येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेले नागरिक बोलत होते. 
 
पालिकेचाही मास्क टाळणाऱ्यांवर डोळा 

प्रत्येकाने मास्क वापरण्याच्या सूचना असताना अनेकांकडून त्याला बगल देण्यात येत आहे. यावर पालिकेकडूनही कारवाई होत आहे. असे असताना अनेक व्यक्‍ती विनामास्क फिरताना दिसतात. यात त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून वाद घालण्याचे प्रकार होत आहे. पेट्रोल पंपावरही असे प्रकार घडल्याची माहिती पंपमालकाकडून देण्यात आली. 

लघुपटाच्या नायिकेनेच लावला निर्मात्याला लाखोंचा चुना
 

जिल्हा प्रशासनाच्या सूचना 

ज्या काळात कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात झाला, त्या काळातच जिल्हा प्रशासनाकडून अशा सूचना देण्यात आल्या होत्या. पण, त्याचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. प्रारंभी काही ठिकाणी असा प्रकार होता, पण कालांतराने तो नजरेआड गेला. पण, या पंपावर हा प्रकार कायम आहे. 

बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाला शेततळ्यात बुडवले
 

कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात झाला त्या काळापासूनच हे फलक आहे. सध्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे हा प्रकार गरजेचा आहे. नागरिकांनीही त्याची गरज समजून घ्यावी. पण, काही युवक नकार दिल्यास वाद घालतात. 
- संजय बोथरा, 
पेट्रोलपंप व्यवस्थापक.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

loading image
go to top