
तुमसर : तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या देवनारा-कुरमुडा दरम्यान असलेल्या तलावाजवळ पट्टेदार वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आज दुपारी उघडकीस आली. वन अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या वाघाची शिकार की घातपात असा प्रश्न निर्माण झाला आहे.