

अकोला : नशिबात आले अंधत्व, तरीही जगण्याची जिद्द, म्हणूनच करताय सुखाचा संसार. मात्र, या लॉकडाउनने आता चांगलेच केले बेजार. बासुरी वाजवून उदरनिर्वाह करत असलेल्या वाघ दाम्पत्याला लॉकडाउनची चांगलीच झळ बसली आहे. त्यामुळे घर कसे चालवावे? असा समोर प्रश्न त्या दिव्यांग दाम्पत्यासमोर उभा राहिला आहे. असे असताना सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला.
सुरुवातीपासूनच दिव्यांगांना समाजात जगताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासन काही मदत करेल या आशेवरही ‘लालफीतशाही’ पाणी फेरते. स्वतःच्या हक्काच्या योजनांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यातच आता लॉकडाउनची भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेक दिव्यांगांना जगण्याची धडपड करावी लागत आहे. हीच स्थिती अकोल्यातही दिसून पडते. शहरातील डाबकी रोड वरील राजेश्वर कॉलनी येथील रहिवाशी किशोर वाघ यांना लॉकडाउनची झळ पोहोचली आहे. किशोर वाघ व त्यांची पत्नी उमा हे दोघे दृष्टीहीन आहे. शहरात बासुरी वाजवून कसाबसा ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
महत्त्वाची बातमी - कोरोनाची अफवा पसरविणे आले अंगलट; मग डॉक्टरही सुटला नाही
त्यांच्या बासुरीच्या सुमधूर ध्वनी माणसाच्या मनमोहून घेतात. त्यामुळेच काय तर अनेक जण त्यांच्या मदतीला धावतात. वाघ दाम्पत्यांचा असा सुरू असलेला सुखी संसार लॉकडाउनमुळे कोलमडून गेला आहे. घराबाहेर जाता येत नाही, मात्र हातावर पोट असल्याने खायचे तरी काय असा प्रश्न पुढे येत आहे. शासन देईल अशीही आशा आहे. परंतु त्यात कुटुंबाचे होईल का? ही देखील चिंता त्यांना सतावत आहे. त्यातच शहरातील किट्स या सामाजिक संस्थेने त्यांना मदतीचा हात दिला आहे. यामुळे वाघ दाम्पत्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
चिमुकला बनला काठी
किशोर वाघ यांचा दोन वर्षांचा चिमुकला मुलगा वेदांत आपल्या वडिलांची काठी बनला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू आणायच्या असल्यास अथवा शहरात कुठे जायचे असल्यात तोच वडिलांना रस्ता दाखवत नेतो.
आवश्यक वाचा - मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने बोलाविले अन्...
‘किट्स’ची मिटविला जेवणाचा प्रश्न
किट्स सामाजिक बांधिलकी विभाग या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून त्या दिव्यांग दाम्पत्याला दोन वेळ जेवण पोहोचविण्यात येत आहे. हा उपक्रम 14 एप्रिल म्हणजेच लॉकडाउन असेपर्यंत करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, आता लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने उपक्रम पुढे सुरू ठेवण्यावर विचार सुरू आहे.
हातावर पोट असणाऱ्यांची ससेहोलपट
लॉकडाउनमुळे नागरिकांचे अर्थचक्र थांबले असताना शहरात अनेक ठिकाणी हातावर पोट असलेल्यांची चांगलीच ससेहोलपट होत आहे. दैनंदिन गरजाही कशा भागवाव्यात असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे अशा गरजुंकरिता सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
खऱ्या गरजुंना मदत हवी
कोरोनाच्या आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक व सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे येत आहे. मात्र, यामध्ये ज्यांना खरी गरज आहे, त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचत नाही. दिव्यांगांना घराबाहेर पडल्याशिवाय पोट भरणे शक्य नाही. त्यामुळे अशा लोकांना मदत मिळायला पाहिजे.
- काजल राजवैद्य, ‘किट्स’ विभाग, अकोला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.