कपडे बदलताना शिक्षिकेचे काढले फोटो 

अनिल कांबळे 
बुधवार, 30 मे 2018

खिडकीतील ब्रश ठेवण्याचे स्टॅंडला धक्‍का लागल्यामुळे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून युवकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपूर - मध्यरात्रीच्या सुमारास घरात महिला कपडे बदलत असताना शेजारी राहणाऱ्या विद्यार्थ्याने खिडकीतून मोबाईलने फोटो काढले तसेच व्हिडीओ शुटींगही केली. खिडकीतील ब्रश ठेवण्याचे स्टॅंडला धक्‍का लागल्यामुळे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून युवकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नेहल कमलाकर थोटे (वय 19, रा. गणेशपेठ) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. 

नेहल हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील रहिवासी आहे. तो शिक्षणासाठी नागपुरात आला होता. त्याने गणेशपेठमधील कर्नलबाग परिसरात किरायाने एक खोली घेतली होती. त्याच्या शेजारी 40 वर्षीय शिक्षिका पती व दोन मुलांसह राहते. मंगळवारी शिक्षिकेच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. रात्री बारा वाजताच्या सुमारास कार्यक्रम संपल्यानंतर ती पतीसह बेडरूममध्ये गेली. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास कपडे बदलवित होती. त्यावेळी आरोपीने त्याच्या घराच्या खिडकीतून महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. खिडकीतील ब्रश खाली पडल्याने महिलेचे लक्ष गेले. तर तो मोबाईल घेऊन पळताना दिसला. महिलेने लगेच पतीला माहिती दिली. मध्यरात्रीच्या सुमारास मुलाची विचारपूस केली. त्याला लगेच गणेशपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्या मोबाईलमधून अश्‍लील क्‍लिप्स जप्त करण्यात आल्या. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The student misbehaved with the teacher in nagpur