esakal | अतिदुर्गम असरअलीच्या सृष्टीचा आवाज आकाशवाणीत घुमणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Shrishti Alappu.

या शैक्षणिक कार्यक्रमाचे आतापर्यंत 22 भाग झाले प्रसारित झाले आहेत. याच उपक्रमात शुक्रवारी सकाळी 10.35 वाजता सृष्टी अल्लपू हिची मुलाखत प्रसारित होणार आहे. हा शैक्षणिक उपक्रम अंगणवाडी ते पाचव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

अतिदुर्गम असरअलीच्या सृष्टीचा आवाज आकाशवाणीत घुमणार 

sakal_logo
By
तिरुपती चिट्याला

सिरोंचा (जि. गडचिरोली) : राज्याच्या दक्षिण टोकावर तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्‍यातील अतिदुर्गम अशा असरअली गावातील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या सृष्टी रमेश अलप्पू या बालिकेचा आवाज शुक्रवारी (ता. 17) सकाळी 10.35 वाजता नागपूर आकाशवाणी केंद्रावर ऐकू येणार आहे. "शाळा बाहेरची शाळा' या अभिनव उपक्रमाद्वारे सृष्टीला ही संधी प्राप्त झाली आहे. 

नागपूरचे विभागीय आयुक्त कार्यालय व प्रथम संस्थेच्या वतीने "शाळा बाहेरची शाळा' हा एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. लॉकडाउनमध्येही विद्यार्थ्यांना शिक्षण हे मिळावे, यासाठी आकाशवाणी केंद्र नागपूर येथून दर मंगळवारी व शुक्रवारी हा उपक्रम प्रसारित होतो. या शैक्षणिक कार्यक्रमाचे आतापर्यंत 22 भाग झाले प्रसारित झाले आहेत. याच उपक्रमात शुक्रवारी सकाळी 10.35 वाजता सृष्टी अल्लपू हिची मुलाखत प्रसारित होणार आहे. हा शैक्षणिक उपक्रम अंगणवाडी ते पाचव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

अवश्य वाचा- नवरीसोबत सासरी गेलेल्या बहिणीवर  अोढवला असा प्रसंग की... 

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाचे कार्य दिले जाते व ते घरी राहूनच पालकांच्या मदतीने पूर्ण करतात. नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांना व अनुभवांना आकाशवाणी केंद्र नागपूर येथून पालक व विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविले जाते. या उपक्रमाच्या 23 व्या भागासाठी असरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेची पाचवीची विद्यार्थिनी सृष्टी रमेश अल्लपू हिची निवड झाली आहे. त्यामुळे सृष्टीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. 

अवश्य वाचा- Video : अमरावतीत तीन मजली व्यापार संकुल कोसळले! आणि....  

डिजिटल शिक्षणाची गंगा... 

असरअली हे अतिदुर्गम गाव असले, तरी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेपर्यंत डिजिटल शिक्षणाची गंगा पोहोचली आहे. विविध डिजिटल माध्यमांतून लॉकडाउनच्या काळातही येथील शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. शासनाने अशा उपक्रमांच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने विद्यार्थी व पालक यांचे मनोबल उंचावेल, अशी आशा व्यक्त होत आहे. 

संपादन - राजेंद्र मारोटकर