छे छेऽऽ पेपर तर ‘नीट’ दिला; सहाशे गुणांची अपेक्षा असताता शून्य गुण कसे मिळणार, विद्यर्थिनी गेली हायकोर्टात

मंगेश गोमासे
Wednesday, 21 October 2020

निकालाच्या दिवशीच तिने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ई-मेलद्वरे निवेदन पाठवून चूक दुरुस्तीची मागणी केली. परंतु, कोणताच प्रतिसाद मिळाली नाही. परिणामी तिने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

नागपूर : नीटच्या परीक्षेत अगदी शून्य गुण मिळालेल्या विद्यर्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात धाव घेत दाद मागितली आहे. या प्रकरणात न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार व नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस बजावून २६ ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागविले आहे. वसुंधरा भोजने असे विद्यर्थिनीचे नाव आहे.

वसुंधरा ही अमरावतीची रहिवासी आहे. तिने दहावीत ९३.४ तर बारावीत ८१.८५ टक्के गुण पटकावले. नीटचा पेपरही चांगला गेला होता. एकूण ७२० गुणांच्या परीक्षेत ६०० हून अधिक गुण मिळतील अशी तिची अपेक्षा होती. पण, १६ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या निकालात तिला शून्य गुण दाखविण्यात आले. तांत्रिक घोळातून हा प्रकार झाला असावा असी तिचा कयास आहे.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

निकालाच्या दिवशीच तिने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ई-मेलद्वरे निवेदन पाठवून चूक दुरुस्तीची मागणी केली. परंतु, कोणताच प्रतिसाद मिळाली नाही. परिणामी तिने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. न्या. अतुल चांदुरकर व न्या. नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सोमवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. नव्याने मूल्यांकन करून निकाल जाहीर करावी, तोवर एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी तिची विनंती आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The student went to the high court after getting zero marks