esakal | विद्यार्थ्यांनो आता चिंता करू नका! ऑनलाइन परीक्षेला मुकणाऱ्यांची होणार लेखी परीक्षा; सिनेट सदस्यांची माहिती  
sakal

बोलून बातमी शोधा

students who unble to give online exam will allow for written exams

नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षा घरून देण्यासाठी ऍप उपलब्ध करून दिला आहे. परंतु, तांत्रिक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे परीक्षा ऍप डाऊनलोड करताना अडचण येत आहे.

विद्यार्थ्यांनो आता चिंता करू नका! ऑनलाइन परीक्षेला मुकणाऱ्यांची होणार लेखी परीक्षा; सिनेट सदस्यांची माहिती  

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी अंतीम वर्षाच्या अंतीम सत्राच्या परीक्षांना 8 ऑक्‍टोबरपासून सुरुवात होत आहे. ऑनलाइन परीक्षा होत असली तरी, ज्या विद्यार्थ्यांजवळ मोबाईल व इतर संसाधनाची कमतरता आहे. विद्यापीठ त्यांची परीक्षा लेखी स्वरूपात घेणार असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकातून विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी दिली आहे.

नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षा घरून देण्यासाठी ऍप उपलब्ध करून दिला आहे. परंतु, तांत्रिक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे परीक्षा ऍप डाऊनलोड करताना अडचण येत आहे. बरेच विद्यार्थी नेटवर्क अभावामुळे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात परीक्षेचे प्रवेशपत्र पाठविले आहेत. 

ठळक बातमी - मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर! विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु

प्रत्येक परीक्षार्थींना स्वतंत्र लॉगिन आयडी व पासवर्ड दिले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातून ते प्राप्त करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या परीक्षांचे आयोजन होत आहे, हे विशेष.

ऑनलाइन परीक्षेत एकूण 50 प्रश्‍न राहतील. त्यापैकी 25 अचूक प्रश्नांनाच गुण दिले जाणार आहेत. परीक्षेचा कालावधी एक तासाचा राहणार आहे. परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर विद्यापीठ करणार असल्याचे श्री. उदापुरे यांनी सांगितले आहे. ऑनलाइन परीक्षेच्या वेळी नेटवर्कमध्ये व्यत्यय आल्यास काही वेळाने जेव्हा नेटवर्क उपलब्ध होईल. तेव्हा सदर पेपर ऑनलाइन जमा करण्याची सोय विद्यापीठाने परीक्षा ऍपमध्ये केली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 20 मिनिटे अधिक वेळ प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी राहील. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना विशेष सहायकाची मदत घेता येईल. परीक्षेच्या 5 मिनिटे अगोदर ऍप कार्यान्वित होणार आहे.

तांत्रिक अडचणींमुळे जे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहतील. अशा विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेची व्यवस्था विद्यापीठामार्फत करण्यात आली आहे. ऑनलाइन परीक्षेनंतर ऑफलाइन लेखी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठ जाहीर करेल. वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष मदत कक्ष स्थापन करावे. 

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

विद्यापीठ निर्देशानुसार विद्यार्थ्याना सूचना देण्यासाठी वॉट्‌सऍप, एसएमएस, भ्रमणध्वनी व ई-मेल चा वापर करावा. तसेच विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाइटवर भेट देवून परीक्षेसंबंधी सूचना जाणून घ्यावा असे आवाहन नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top