

Leaf Art
sakal
आरती दलाल-धारकर
नागपूर : एखादं सुकलेलं पान... साधं, नजरेआड जाणारं. पण त्या पानावर रंगाची हलकीशी रेघ उमटताच ते जिवंत होतं. निसर्गदृश्य, व्यक्तिविशेष किंवा एखादे भावचित्र त्यातून साकारले जाते. त्या कलावंताचे अवघे भावविश्वच जणू त्यात उमटते. कलाकाराला कुठल्याही मर्यादा नसतात हे अधोरेखित करणारा असाच एक अवलिया कलावंत झाडाच्या पानातून पर्णचित्रे साकारतोय.