Sudhir Mungantiwar
esakal
राज्य विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन अवघ्या दोन आठवड्यांत ठेवण्यात आलं आहे. यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागपुरात ७ डिसेंबरपासून सुरू होणारे हे अधिवेशन १८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र, एवढ्या कमी कालावधीत राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर पुरेशी चर्चा होणार कशी, असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी अधिवेशनाची मुदत किमान तीन आठवडे ठेवण्याची मागणी केली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.