
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप या खाणी आहे. या खाणीतून मोठ्या प्रमाणावर धूळ प्रदूषण करण्यात येते. मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत असताना वेकोलिचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. केवळ थातूरमातूर पाणी मारण्याचा प्रकार सुरू आहे.
राजुरा (जि. चंद्रपूर) : तालुक्यातील वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत धुळीमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय ब्लास्टिंग, वाहतुकीमुळे धुळीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. याचा दुष्परिणाम मानवी आरोग्य व शेती उत्पादनावर होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा श्वास गुदमरत आहे.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप या खाणी आहे. या खाणीतून मोठ्या प्रमाणावर धूळ प्रदूषण करण्यात येते. मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत असताना वेकोलिचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. केवळ थातूरमातूर पाणी मारण्याचा प्रकार सुरू आहे. कोळसा खाणीत धूळ प्रदूषण होऊन कामगारांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी वेकोलिने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला
मात्र, वेकोलि याकडे दुर्लक्ष करीत आहे. कोळसा वाहतुकीमुळे या भागातील रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. धुळीचा मानवी आरोग्य, शेतीवर परिणाम होत आहे. वेकोलिमधून काढण्यात येणारी माती ढिगारे शेतीसाठी मारक ठरत आहेत. अनेक गावांना बॅकवॉटरचा फटका पावसाळ्यात बसतो.
धूळ प्रदूषणात झाली वाढ
वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे धूळ प्रदूषणात वाढ झाली आहे. कोळशाच्या धुळीमुळे शेतपिकांवर विपरित परिणाम झाला आहे. कापूस काळवंडले आहे. मानवी आरोग्यावर दुष्परिणाम झाले आहेत. मात्र, वेकोलिचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे.
- भास्कर जुनघरी,
शेतकरी, गोवरी
संपादन - नीलेश डाखोरे