esakal | अत्याचारातून मुलगी झाली सात महिन्यांची गरोदर, मग...
sakal

बोलून बातमी शोधा

atyachar

अत्याचारातून मुलगी झाली सात महिन्यांची गरोदर, मग...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दर्यापूर (जि. अमरावती) : तालुक्यातील येवदा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने व यातून ती सात महिन्यांची गरोदर राहिल्याने पीडित युवतीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले आहे.

गुरुवारी (ता. ९) येवदा पोलिसात तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात कोण दोषी आहे याबाबत येवदा पोलिस तपास करीत आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. येवदा पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात सदर मुलगी आई-वडिलांसोबत राहत होती.

हेही वाचा: मेट्रो भरती घोटाळ्यावर विजय वडेट्टीवार आक्रमक; म्हणाले...

आई-वडिलांनी यासंबंधात संशयित मुलाकडे चौकशी केली. मात्र, त्याने असे काहीही झाले नसल्याचे म्हणत हातवर केले. या प्रकाराने धक्का बसून मुलीने २९ ऑगस्टला रात्री गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, याबाबतची तक्रार काल पोलिसांत दाखल झाली आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या युवकास ताब्यात घेण्यात आले आहे. अचलपूर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पुढील चौकशी करण्यात येणार आहे.
- अमोल बछाव, ठाणेदार, येवदा
loading image
go to top