esakal | मेट्रो भरती घोटाळ्यावर विजय वडेट्टीवार आक्रमक; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Vijay Wadettiwar

मेट्रो भरती घोटाळ्यावर विजय वडेट्टीवार आक्रमक; म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : महा मेट्रोमधील भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण पुढे आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भरती घोटाळा. एससी, एसटी, ओबीसी, ईडब्लूएस वर्गाच्या आरक्षित जागांवर खुल्या वर्गातून भरती करण्यात आली आहे. यामुळे मेट्रो भरती घोटाळ्याप्रकरणी मी स्वतः मेट्रो ॲाफीसवर धडक देणार आहे. पुढील भरतीत मागासवर्गीयांचा कोटा पूर्ण करायला लावू. आरक्षित जागांवर त्याच वर्गाच्या उमेदवारांची पदभरती व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठकीत मागणी करणार असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

नागपूर मेट्रोने ‘बॅकलॅाग भरला नाही तर मुख्यमंत्र्यांशी बोलून एफआयआर दाखल करणार आहे. ओबीसी, एससी, एनटींना डावलून ओपनच्या जास्त जागा भरल्या आहेत. मंत्री असूनही मेट्रो विरोधात मोठी भूमिका घेणार असल्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. मेट्रो भरती घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मेट्रोत आरक्षण डावलून पदभरती घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले आहे.

हेही वाचा: अस्वलाच्या हल्ल्यात वृद्धेचा फुटला डोळा अन् गंभीर जखमा

जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदाच्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १७ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या ५० वर्षांत अतिवृष्टीमुळे झालेले हे सर्वाधिक नुकसान आहे. मृतांच्या नातेवाइकांना तातडीने मदत पोहोचवली आहे. जनावरे वाहून गेली असले तर त्याचा मोबदला देण्याचे निर्देश दिल्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अजूनही पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणतीही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. जुन्या निकषाप्रमाणे एनडीआरएफमधून मदत मिळते. ते वाढवून देण्याची केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

महिला अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी प्राधान्य

देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मध्य प्रदेशात बलात्कार पीडित महिला आणि आरोपी गायब झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील आरोपी विकृत आहे. महिला अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी प्राधान्य देत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा: देवानंदचा १३५ दिवस मृत्यूशी संघर्ष; धोका टळलेला नाही

गरज भासल्यास परीक्षा पुढे ढकलू

महाज्योतीची चाचणी परीक्षा गरज भासल्यास पुढे ढकलू. परीक्षेचा कालावधी १० ॲाक्टोबरपर्यंत आहे. सर्वांचे मत असेल तर परीक्षा पुढे ढकलू. विद्यार्थ्यांना वंचित ठेवणार नाही, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

loading image
go to top