दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; पेरणीची सोय नसल्याने मृत्यूला केले जवळ

दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; पेरणीची सोय नसल्याने मृत्यूला केले जवळ
Updated on: 

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : एकीकडे कोरोनाने हाहाकार माजविला असतानाच तालुक्‍यातील दोन शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीची सोय नसल्याने रविवारी (ता. ३०) मृत्यूला जवळ केले आहे. हरीश चौधरी आणि शुभम ठाकरे अशी मृतांची नावे आहेत. (Suicide of two farmers in Dhamangaon taluka of Amravati district)

तालुक्‍यातील देवगाव येथील अल्पभूधारक शेतकरी हरीश शिवराज चौधरी (वय ४०) हे दुपारी शेतातून घरी परत आले व खोलीत गेले. त्यानंतर खोलीत गळफास लावलेल्या अवस्थेत ते आढळून आले. अनेक दिवसांपासून खरीप हंगामाच्या पेरणीच्या चिंतेत ते होते, असे पत्नी शालिनी चौधरी यांनी सांगितले. मृताच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी देवगाव येथील उपसरपंच विशाल जैस्वाल यांनी केली आहे.

दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; पेरणीची सोय नसल्याने मृत्यूला केले जवळ
वीज पडून शेतकरी ठार; यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्‍यात मुसळधार पाऊस

झाडा येथील शुभम संतोष ठाकरे (वय २४) याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. शुभमच्या आजोबाच्या नावाने शेती आहे. परंतु, सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत होता, असे मृताचे वडील संतोष चौधरी यांनी सांगितले. दरम्यान मृताच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी झाडा येथील सरपंच मंगेश बोबडे यांनी केली आहे.

कुटुंबीयांना मदत द्यावी

शेतकऱ्यांच्या अवस्था अत्यंत दयनीय आहे. अस्मानी व कोरोनाच्या संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲड. चेतन परडखे यांनी केली आहे.

(Suicide of two farmers in Dhamangaon taluka of Amravati district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com