Buldhana Heavy Rain : सुलतानपूर मंडळातही अतिवृष्टी; अनेकांच्या घरात पाणी, प्रचंड नुकसान, आ. खरात यांची भेट
Maharashtra Flood : बुलडाण्याच्या लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे मुसळधार पावसामुळे शेती, घरांची नासाडी झाली असून, ६०% पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे.
सुलतानपूर : लोणार तालुक्यात २५ व २६ जून रोजी झालेल्या सततधार पावसाने नदी नाले तुडुंब झाले आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने नुकसान झाल्याचे चित्र आहे. सुलतानपूर येथे शेगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या साईडला असलेल्या नागरिकांच्या घरात शिरले आहे