Amravati Summer Heat
sakal
अमरावती - उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून बुधवारी (ता. १५) अमरावतीचे तापमान ४४ अंश सेल्सियस नोंदविले गेले. विशेष म्हणजे, विदर्भातील अकोला जिल्हा सर्वाधिक हॉट असून आज अकोल्याचे तापमान ४४.२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. म्हणजेच अमरावती आणि अकोला जिल्ह्यात जवळपास सारखेच तापमान आहे.