Missing Minor Girls from Sungaon Traced to Ahilya Nagar District
sakal
संग्रामपूर : बुलढाणा जिल्ह्यातील जळगावं जा तालुक्यातील सुनगाव येथील वर्ग दहावीत शिकणाऱ्या तीन मैत्रिणी दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव जामोद शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये तंत्रशिक्षणासाठी गेल्या होत्या.परंतु त्या सायंकाळी घरी परत आल्या नव्हत्या,तिन्ही मुलींच्या पालकांनी जळगाव शहरात जाऊन बस स्थानक परिसर व मैत्रीणीकडे व नातेवाईक यांच्यासह सर्वत्र शोध घेतला परंतु त्या मिळुन आल्या नाहीत.त्यामुळे तिन्ही अल्पवयीन मुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठले व सर्व वृत्तांत ठाणेदार नितीन पाटील यांना सांगितल्याप्रमाणे पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अप.क्र.५७८/२०२५ कलम१३७(२) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.