गावाच्या वेशीवर सापडल्या उलट्या टांगलेल्या बाहुल्या आणि लिंबू; अंधश्रद्धेमुळे उलटसुलट चर्चांना उधाण

Superstitious dolls and lemons found on border of village in Yavatmal
Superstitious dolls and lemons found on border of village in Yavatmal

दिग्रस (जि. यवतमाळ) : सध्या विज्ञान युग सुरू आहे. २१ व्या शतकात एकीकडे दुनिया मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो तर दुसरीकडे अजुनही ग्रामीण भागात अंधश्रद्धा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच घटना दिग्रस तालुक्यातील डोळंबा येथे पुढे आली. डोळंबा गावाच्या शिवेवर एका कडूलिंबाच्या झाडाला बिबा, लिंबू आणि पाच रंगीत कापडाच्या बाहुल्या झाडाला उलट्या अवस्थेत खिळ्याच्या साहाय्याने टांगलेल्या आढळून आल्या. या प्रकारामुळे गावकऱ्यांच्या मनात अंधश्रद्धेच्या बहुल्या घर करून बसल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिग्रस तालुक्यातील डोळंबा गावाच्या शिवेवर कडूलिंबाच्या झाडाला बिबा, लिंबू व पाच  रंगीबेरंगी बाहुल्या टांगून असल्याची माहिती गावाऱ्यांनी दिली. या बाहुल्या महाशिवरात्री नंतर च्या शुक्रवारी किंवा शनिवारच्या अमावस्येच्या रात्री झाडाला टांगल्या असाव्यात असे बोलले जात आहे. 

परंतु लिंबू, बिबा व रंगीत बाहुल्या टांगल्याचा  प्रकार पाहून गावावर कोणता जादूटोणा करण्याच्या उद्देशाने तर करण्यात आला नसेल ना ? गावावर कोणते संकट तर येणार नाही ना ? असे अनेक प्रश्न कडूलिंबाच्या झाडाला उलट्या अवस्थेत टांगलेल्या रंगीबेरंगी बहुल्यांना पाहून डोळंबावासीयांना पडले आहेत.

या घटनेने डोळंबा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण दिग्रस तालुक्यात उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. २१ व्या शतकात सुद्धा अशा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अनेक जण असे घृणीत प्रकार करतांना दिसत आहेत. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली मानसिक विकृती ही घातक ठरणारी आहे. त्यामुळे कुठेतरी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने जनजागृती करण्याची गरज असल्याचं मत अनेकांकडून ऐकायला मिळत आहे.   

अंधश्रद्धेच्या बाहुल्या नाचताहेत 

गेल्या शुक्रवारी व शनिवारी अमावस्या होती व त्यापूर्वी महाशिवरात्री होती. याच अमावस्येचा व महाशिवरात्रीचा मध्य साधुन ह प्रकार केला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे डोळंबा वासीयांच्या मनामध्ये कुठेतरी या अंधश्रद्धेच्या बाहुल्या नाचतच असल्याचे दिसून येत आहे. परंतु झाडाला लिंबू, बिबा व बाहुल्या कुणी व कशासाठी टांगल्या हा प्रश्न आद्यपही अनुत्तरितच आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com