esakal | अंधारामुळे पीडितेने आरोपीला ओळखले नसावे, उच्च न्यायालयाने विनयभंगातील आरोपीची केली निर्दोष मुक्तता
sakal

बोलून बातमी शोधा

high court relief to accused in case of mistreatment with women

या विरोधात आरोपी मनोहर भोयर (३०) याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार, सदर घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी जिल्ह्यातील कुरझाडी गावातील १९ ऑगस्ट २००७ रोजीची आहे.

अंधारामुळे पीडितेने आरोपीला ओळखले नसावे, उच्च न्यायालयाने विनयभंगातील आरोपीची केली निर्दोष मुक्तता

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : विनयभंगाच्या एका प्रकरणातील आरोपीला घटनास्थळी असलेल्या अंधारामुळे पीडितेने ओळखण्यात चूक केली असावी, अशी शक्यता वर्तवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका युवकाला निर्दोष मुक्त केले. तसेच, या प्रकरणात पीडित आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या साक्षीमध्ये बरेच विरोधाभास असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले. वर्धा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत तीन महिन्यांचा कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला होता. 

हेही वाचा - ३० वर्षांपूर्वीही ममतांवर झाला होता जीवघेणा हल्ला,...

या विरोधात आरोपी मनोहर भोयर (३०) याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार, सदर घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी जिल्ह्यातील कुरझाडी गावातील १९ ऑगस्ट २००७ रोजीची आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ती रात्री आठच्या सुमारास घराबाहेर उभी असताना आरोपी तेथे आला आणि तिचा हात धरला. पीडितेने आरडा-ओरड केल्याने तिचे कुटुंबीय तेथे पळत आले. या प्रकरणात वर्धा सत्र न्यायालयाने आरोपीला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. या निर्णयाला आव्हान देत आरोपीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. 

हेही वाचा - नागपुरातील तक्रार औरंगाबादेत गेली कशी? न्यायालयाकडून...

साक्षीदारांपैकी पीडितेच्या दिराने घटनेच्या वेळी घरात टीव्ही पाहत असल्याचे विधान केले. आवाज ऐकून तो घराबाहेर पडल्याचे नमूद केले. तर, पीडितेच्या मुलाने आपले घर गावापासून दूर असल्याने घरात आणि परिसरात वीज नसल्याचे नमूद केले. त्याची आई आणि आरोपी यांच्यात जुना वाद असल्याचेही मुलाने कबूल केले. त्यामुळे उच्च न्यायालयाने साक्षीदारांची विधाने परस्परविरोधी आहेत व घटनेच्या वेळी, घटनास्थळी असलेल्या अंधारामुळे पीडितेने आरोपीचा चेहरा पाहिला नसेल, असे मत व्यक्त केले. ठोस पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने आरोपीची शिक्षा रद्द करून त्याला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. 

loading image