मशीनमध्ये अडकून सुपरवायझरचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

हिंगणा एमआयडीसी : एमआयडीसी परिसरातील नागपूर रिफ्रेक्‍टरीज कारखान्यात मशीनवर काम करताना झालेल्या अपघातात तेथील सुपरवायझरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

हिंगणा एमआयडीसी : एमआयडीसी परिसरातील नागपूर रिफ्रेक्‍टरीज कारखान्यात मशीनवर काम करताना झालेल्या अपघातात तेथील सुपरवायझरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
रामआसरे नारायण कोरी (वय 65, सीआरपीएफ गेट, हिंगणा रोड, नागपूर) असे मृताचे नाव असून ते एमआयडीसीतील नागपूर रिफ्रेक्‍टरीज प्रा. लि.(प्लॉट क्र. एन. 75) या भट्टीकरिता लागणाऱ्या विटा निर्मितीच्या कंपनीत सुपरवायझर पदावर काम करीत होते. मंगळवारी सकाळी 8:30 वाजता ते ड्यूटीवर गेले होते. तिथे मिक्‍सर मशीनवर काम करीत असताना अचानक त्यांच्या गळ्यातील दुपट्टा मशीनमध्ये अडकला व त्यात गळफास लागून त्यांचा गळा कापला. घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय कारखान्यात पोहचले. पोलिसांनासुद्धा सूचना देण्यात आली. एमआयडीसीचे ठाणेदार भारत क्षीरसागर व चमू घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता नागपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
सुरक्षेकडे दुर्लक्ष
कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना आस्थापनेकडून सुरक्षेच्या दृष्टीने साधने उपलब्ध करून दिली पाहिजेत. अनेक कारखान्यांत सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य पुरविले जात नाही. मात्र अजूनही अनेक कारखान्यांत याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अशाप्रकारे अपघात होतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supervisor's death by getting stuck in a machine