
राज्यातील सर्व जातींना एकत्र करताना थोडा समन्वयाचा अभाव होऊ शकतो. मी मंत्री जरी असलो तरी मंत्रिपद हे औट घटकेचे आहे. मला ओबीसींच्या हक्कासाठी लढावे लागेल, असेही ते म्हणाले.
नागपूर : काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी मोठे विधान केले होते. ‘फडणवीसांच्या हातात सत्ता द्या, मी तुम्हाला आरक्षण देतो’ असे ते म्हणाले होते. आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समोर करून उदयनराजे भोसलेंवर चांगलेच बरसले. ‘आरक्षण द्यायला सुप्रीम कोर्ट काय फडणवीस यांच्या हातात आहे का’ असा प्रश्न वडेट्टीवारांनी उदयनराजेंना उद्देशून केल्याने फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सर्व जातींना एकत्र करताना थोडा समन्वयाचा अभाव होऊ शकतो. मी मंत्री जरी असलो तरी मंत्रिपद हे औट घटकेचे आहे. मला ओबीसींच्या हक्कासाठी लढावे लागेल, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीत मिळालेला कौल म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने वर्षभरात केलेल्या चांगल्या कामांवर मतदारांनी शिक्का मारला आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय सेवा संघाचा ५८ वर्षांपासून असलेला गड आम्ही उद्ध्वस्त केला आहे. मंत्रीपद गेले तरी बेहत्तर, पण मी ओबीसींसोबतच आहे, होतो आणि राहणार आहे. आरक्षणच्या मागणीसाठी आम्ही संपूर्ण ताकतीनीशी मराठा समाजासोबत आहोत, पण ओबीसींमधून आरक्षणाची मागणी करणे सर्वार्थाने चुकीचे आहे. न्यायातून बाजूला कधीही हटणार नाही.
राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ओबीसींच्या साथीमुळे महाविकास आघाडीला चांगले यश मिळविले आहे. औरंगाबादमधील मेळाव्यात गैरसमजुतीतून वाद झाला होता. तो वाद आता मिटला आहे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
संपादन - नीलेश डाखोरे