Amravati Crime: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू; घातपाताची शक्यता, परिधान केलेले दागिने लुटल्याचा संशय
Crime News: अमरावतीमध्ये एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या गळ्याभोवती व्रण व दागिने गायब असल्याने हत्या व लूटमार याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अमरावती : महिला पोलिस कर्मचाऱ्याचा घरातच संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून शुक्रवारी (ता. १) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वडाळीच्या गुरुकृपा कॉलनी परिसरात ही घटना घडली.