Farmers Protest : प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून शासनाचा निषेध
Farmer Rights : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने रमेश महाराज यांनी १८ जूनला मानोरा येथे प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध नोंदवला.
मानोरा : शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी वारंवार निवेदन देऊन शासन निवेदनाची दखल घेत नसल्याने १८ जूनला रमेश महाराज यांनी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून शासनाच्या धोरणाचा निषेध केला आहे.