Chandrapur News: ताडोबात उभे राहिले १६ कृत्रिम पाणवठे राज ठाकरे यांचे आदेश; मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार

Raj Thackeray Responds to Viral Tadoba Video: ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांच्या पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी १६ कृत्रिम पाणवठे उभारले आहेत.
Chandrapur News

Chandrapur News

esakal

Updated on

चंद्रपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निदर्शनास आलेला अवघ्या काही सेकंदांचा एक व्हिडिओ ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी महत्त्वाचा ठरला आहे. पाण्यासाठी भरदिवसा रस्त्यावर भटकणाऱ्या हरणांच्या जोडीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी तातडीने मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि अवघ्या काही तासांत ताडोबा परिसरात १६ कृत्रिम पाणवठे उभारण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com