Wildlife Tourism : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने बुकिंग फुल्ल झाले असून, वाघ, बिबट, अस्वली आणि विविध पक्ष्यांचे दर्शन पर्यटकांना आकर्षित करत आहे.
चंद्रपूर : जैविक विविधता, नैसर्गिक वारसा लाभलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तशी बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते. मात्र, नाताळ आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नववर्षाच्यानिमित्ताने ताडोबा पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहे.