Tadoba Tiger Reserve
esakal
राज्य सरकारने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव कॉरिडॉरमधील लोहखनिज प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याचा थेट परिणाम वाघांसह इतर वन्यजीवांवर होणार आहे. विशेष म्हणजे राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांचा विरोध डावलून राज्य सरकारने या परिसरातील खाणीला मुंजरी दिल्याची माहिती आहे. या निर्णयानंतर आता वन्यजीव अभ्यासकांकडून चिंताही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.