Tourists rush without safari for tiger photos : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे जाणाऱ्या पद्मापूर ते मोहर्ली या मार्गावरच वाघाचे दर्शन होत आहे. टायगर सफारी न करता वाघ बघायला मिळत असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात या मार्गावर गर्दी करीत आहेत. वाघ दिसताच फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी नागरिकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. यामुळे रस्त्यावरच लोकांचा गोंगाट बघायला मिळत आहे.