पाच हजारांत दहावीची गुणपत्रिका घेता का होऽऽ; एजंटसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Take the tenth marksheet in five thousand Charges filed against three including the agent
Take the tenth marksheet in five thousand Charges filed against three including the agent

अमरावती : पाच हजार रुपयांमध्ये दहावी उत्तीर्णची गुणपत्रिका तयार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहर कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध बनावट दस्तऐवज तयार करून वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. प्रज्वल प्रशांत दाते (वय २३, रा. वरुड), सुनील बनारसे व अन्य एक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. असे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांनी सांगितले.

प्रज्वलची दहावी उत्तीर्णची गुणपत्रिका गहाळ झाल्यामुळे त्याने दुय्यम प्रत मिळविण्यासाठी बोर्डाकडे अर्ज केला होता. ज्यावेळी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी गुणपत्रिका तयार करण्यासाठी त्याने नमुद केलेल्या कालावधीसोबत जुळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार्यालयीन अभिलेखासोबत प्रज्वलने सादर केलेली माहिती जुळत नसल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे याप्रकरणाची तक्रार बोर्डाकडून नागेश भास्कर दुराणी (वय ५७, रा. मंगल कॉलनी) यांनी शहर कोतवाली ठाण्यात दाखल केली.

त्यापूर्वी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना प्रज्वलची गुणपत्रिका बनावट असल्याचे निदर्शनात येताच त्यांनी त्याची चौकशी केली असता काही वर्षांपूर्वी त्याने ही गुणपत्रिका ५ हजार रुपयांमध्ये सुनील बनारसेसह अन्य एक अशा दोघांकडून तयार करून घेतल्याचे सांगितले. बनावट गुणपत्रिका खरी असल्याचे भासवून त्याचा गैरवापर झाल्याची तक्रार बोर्डाकडून नोंदविण्यात आल्याने कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

संबंधितांच्या अटकेची कारवाई केल्या जाईल
याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तपासात आवश्‍यकता भासल्यास संबंधितांच्या अटकेची कारवाई केली जाईल.
- राहुल आठवले,
पोलिस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे

सर्वच व्यक्ती बाहेरचे
बनावट गुणपत्रिका प्रकरणात ज्यांची नावे पुढे आलीत त्यापैकी कुणाचाही बोर्डाशी काहीही संबंध नाही. त्यात सर्वच व्यक्ती बाहेरचे आहेत.
- जयश्री राऊत,
सहायक सचिव, एस.एस.सी. बोर्ड अमरावती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com