निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणे तलाठ्याला भोवले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

मेहकर (जि.बुलडाणा) : लोणार तालुक्यातील सावरगाव मुंढे येथील तलाठी अनिल माणिकराव गरकळ हे वाशीम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार रॅलीत तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या सभांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी त्या तलाठ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तरी देखील त्या तलाठ्याने कुठलाही प्रकारचे स्पष्टीकरण न दिल्यामुळे सोमवार (ता.6) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रचार कामात सहभागी असल्याची छायाचित्रे व व्हिडीओ प्राप्त झाले होते. त्यानुसार त्यांनी श्री. गरकळ यांना 3 जानेवारी रोजी सदर बाबीचा खुलासा मागीतला होता. परंतु त्यांनी कार्यालयाकडे कुठलाही प्रकारचा खुलासा सादर केला नाही. तसा लोणार तहसीलदार यांनी अहवाल सादर करत टिटवी मंडळ अधिकाऱ्याच्या अभिप्रायानुसार श्री. गरकळ हे मुख्यालयी राहत नसल्याबाबत व सातत्याने गैरहजर 21 डिसेंबर 2019 ला पी. एम. किसान योजनेबाबत आढावा सभेमध्येही हजर नव्हते. त्यामुळे सदरचे कामेही प्रलंबीत आहेत. 30 डिसेंबर पासून अनिल गरकळ हे विना परवानगी सांझावर गैरहजर आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची अडचण होत आहे. तर रिसोड पोलिस निरीक्षक यांनी 6 जानेवारीला दिलेल्या पत्रानुसार 24 डिसेंबरला श्री.गरकळ यांनी रिसोड तालुक्यातील भरजहॉगीर ग्रामस्थांना भावनिक करून राजकीय फायद्यासाठी रिसोड ते भर जहागीर रस्त्यावर एक ते दीड मिनीट रस्ता रोकोसारखे गंभीर आंदोलन केले. वेळीच घटनास्थळी पोलिस पोहोचली नसती तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असती.

हेही वाचा - सोन्याचा भाव पाहूच नका, परवडणारं नाही ते!

श्री.गरकळ यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) चे उल्लंघन करून कर्तव्यात पारायणता व सचोटी न ठेवण्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासकीय कामकाज न करणे, विना परवानगी मुख्यालयी अनुपस्थिती राहणे, कायदा व सुव्यवस्था प्रश्‍न निर्माण करणे व निवडणुकीमध्ये प्रचार करणे यावरून त्यांनी शिस्तभंग केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना पुढील आदेशापर्यंत निलंबीत करण्यात येत आहे. निलंबन काळामध्ये त्यांचे मुख्यालय हे मेहकर तहसील राहणार असून, तहसीलदाराच्या पुर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडण्याची परवानगी घेता येणार नाही. अनिल गरकळ यांना निलंबीत केल्यामुळे त्यांच्या साझ्याचा प्रभार तहसीलदार लोणार यांनी त्यांच्या स्तरावरून जवळच्या तलाठ्याकडे अतिरिक्त स्वरुपात हस्तांतरीत करावा असे आदेशात नमूद केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: talathi was involved in election campaigning