
मुलगा हा शाळेत धिंगाणा घालतो, गोंधळ करतो. त्यामुळे शिक्षिका मनिषा शेंबडे यांनी त्याला 200 उठबशा काढण्याची शिक्षा केली. त्या शिक्षेची अंमलबजावणी करताना लहान मुलगा चांगलाच भेदरून गेला. या शिक्षेचा त्याला त्रास झाल्याने तो आजारी पडला. पालकांनी जेंव्हा त्याला कारण विचारले तेंव्हा त्याने सगळी घटना सांगितली. त्यानंतर त्याच्या पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्याच्या प्रतिलिपी जि. प. अध्यक्ष, पं.स. सभापती, शिक्षणाधिकारी, शेगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बापरे! शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात
जलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.
हेही वाचा - महानगरपालिका करणार मालमत्ता सिल
शिक्षकेवर कारवाईची केली मागणी
विद्यार्थ्यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, त्यांचा मुलगा पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिकतो. दरम्या, मुलगा हा शाळेत धिंगाणा घालतो, गोंधळ करतो. त्यामुळे शिक्षिका मनिषा शेंबडे यांनी त्याला 200 उठबशा काढण्याची शिक्षा केली. त्या शिक्षेची अंमलबजावणी करताना लहान मुलगा चांगलाच भेदरून गेला. या शिक्षेचा त्याला त्रास झाल्याने तो आजारी पडला. पालकांनी जेंव्हा त्याला कारण विचारले तेंव्हा त्याने सगळी घटना सांगितली. त्यानंतर त्याच्या पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्याच्या प्रतिलिपी जि. प. अध्यक्ष, पं.स. सभापती, शिक्षणाधिकारी, शेगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या शिक्षिकेविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली. मुलावर सध्या उपचार सुरू आहे. हसत-खेळत दिलेले शिक्षण हे सर्वात योग्य असते. त्यामुळेच विद्यार्थी जास्त चांगल्या पद्धतीने ग्रहण करतात असे सांगितले जाते. मात्र, असे सातत्याने सांगितले जात असतानाच हा प्रकार समोर आल्याने पालकांनाही धक्का बसला आहे. या वयात मुलांनी एकदम आदर्श राहावा असे अपेक्षीतच धरले जाऊ नये. त्यांनी धिंगाना, मस्ती करावी, खेळावे असेच अपेक्षीत आहे. मात्र, याची जाणीव या शिक्षिकेला नाही का? असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान या संदर्भात शेगाव पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकाऱ्यांशी घटनेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.
Web Title: Teacher Provided 200 Get Punishment Student Arrived Hospital Directly
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..