शिक्षिकेने गाठला कळस, होमवर्क केला नाही म्हणून चिमुकल्या विद्यार्थिनीला....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

वर्गशिक्षिकेने विद्यार्थ्यांना होमवर्क (गृहपाठ) दिले. दुसऱ्या दिवशी शिक्षिकेने होमवर्कची तपासणी सुरू केली. यावेळी पीडित विद्यार्थिनीने होमवर्क केले नसल्याचे त्या शिक्षिकेला दिसले. त्यामुळे शिक्षिकेने तिला काडीने पाठीवर व पायावर मारहाण केली. या मारहाणीमुळे त्या कोवळ्या जीवाच्या पाठीवर व पायावर व्रण उमटले. 

वरोरा (जि. चंद्रपूर) : घरी करायला दिलेला होमवर्क (गृहपाठ) करून आणला नाही म्हणून केजी वनमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीला वर्गशिक्षिकेने काडीने मारहाण केली. यामुळे विद्यार्थिनीचे पाय आणि पाठीवर व्रण आले आहेत. पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी वरोरा पोलिस ठाण्यात त्या शिक्षिकेविरुद्ध तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालुक्‍यातील एकार्जुना येथील न्यू मॉडेल कॉन्व्हेंट स्कूल येथे घडली. 

अवश्य वाचा- लग्नाचे आमिष दाखवून चक्क महिलेला नेले पळवून

तालुक्‍यातील एकार्जुना येथे न्यू मॉडेल कॉन्व्हेंट स्कूल आहे. गावातील पीडित छोटीशी मुलगी या शाळेत केजी वनमध्ये शिकत आहे. घटनेच्या एकदिवस आधी वर्गशिक्षिकेने विद्यार्थ्यांना होमवर्क (गृहपाठ) दिले. दुसऱ्या दिवशी शिक्षिकेने होमवर्कची तपासणी सुरू केली. यावेळी पीडित विद्यार्थिनीने होमवर्क केले नसल्याचे त्या शिक्षिकेला दिसले. त्यामुळे शिक्षिकेने तिला होमवर्कबाबत विचारणा करीत काडीने पाठीवर व पायावर मारहाण केली. या मारहाणीमुळे त्या कोवळ्या जीवाच्या पाठीवर व पायावर व्रण उमटले. 

शिक्षिकेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

शाळा सुटल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकाने तातडीने शाळा गाठून शिक्षिका आणि संस्थाचालकास याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी प्रकरणावर पांघरूण घालत उडवाउडवीची उत्तरे दिली. आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार अन्य मुलांसोबत घडू नये म्हणून पीडित मुलीच्या वडिलांनी वरोरा गाठून तेथील पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher terriblely punished a small girl for not doing homework

टॅग्स
टॉपिकस