शिक्षकच असे वागले तर विद्यार्थ्यांना संस्कार देणार कोण? जगाला शिक्षण देणारेच सापडले जुगाराच्या अड्ड्यावर..वाचा सविस्तर.. 

बाळू जीवने
Monday, 27 July 2020

चांगले काय वाईट काय या सर्व गोष्टींचे धड आपण आपल्या आपल्या शिक्षकांकडून घेत असतो. मात्र आपले शिक्षकच घृणास्पद कृत्य करायला लागले तर? अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात घडली आहे.

वरोरा(जि. चंद्रपूर) : आईनंतर आपल्याला संस्कारांचे धडे देणारी व्यक्ती म्हणजे आपले शिक्षक. लहान मुलांना संस्कार देऊन त्यांना योग्य ते शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांप्रमाणेच विद्यार्थी वागतात. मात्र शिक्षकांच्या या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम चंद्रपूर जिल्ह्यातील काही शिक्षकांनी केले आहे.  

चांगले काय वाईट काय या सर्व गोष्टींचे धड आपण आपल्या आपल्या शिक्षकांकडून घेत असतो. मात्र आपले शिक्षकच घृणास्पद कृत्य करायला लागले तर? अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात घडली आहे. कोरोना युद्धात पोलिस, डॉक्‍टर, प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी जिवाची बाजी लावत आहेत. दुसरीकडे काही शिक्षक पैशाची बाजी खेळत उधळपट्टी करीत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा- बाप रे! नागपुरात कुत्र्याला कोरोना?... कुत्र्याला खोकला झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण..

 जुगार सुरु असल्याची माहिती 

व्होल्टास कॉलनीतील संजय पांडुरंग आगलावे यांच्या घरी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने तेथे छापा टाकला. विशेष म्हणजे या जुगाराच्या अड्ड्यावर जुगार खेळणारे चक्क शिक्षक होते. 

चार जणांना करण्यात आली अटक

याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. त्यात शिक्षकासह एका पोलिसाच्या मुलाचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. संजय पांडुरंग आगलावे, सुनील मोहन खारकर, कुणाल साईनाथ पदमेकर आणि विजय देवराव सातपुते यांना अटक केली. घटनास्थळावरून तब्बल  1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दोन शिक्षकासह एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. 

क्लिक करा - अमरावतीत हे चाललंय काय! पोलिसच पोलिसांपासून नाही सुरक्षित; उघडकीस आली 'ही' धक्कादायक घटना...

काही दिवसांपूर्वी घडला होता असाच प्रकार 

काही दिवसांपूर्वीच सुभाष वॉर्डात जुगार खेळताना नऊ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातही एका शिक्षकाचा समावेश होता. या दोन प्रकरणांमुळे शिक्षक वर्गात एकच खळबळ उडाली आहे.  

 संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers found in gambling in chandrapur district read full story